देशातील सर्वात महागडे परफ्यूम

आपण सर्वोत्कृष्ट आणि सर्वात महाग परफ्यूम्सबद्दल बोललो तर ही नावे यादीच्या सर्वात टॉपला येतात. त्यांची किंमत आणि सुगंध दोन्ही आश्चर्यचकित करतात. यापैकी कोणतेही परफ्यूम तुम्ही लावले की त्याचा वास तुम्हाला अक्षरशः वेड लावेल. चला तर मग पाह्या कोणती आहेत ही परफ्यूम्स... या यादीत क्रीड अवंट्सचे नाव प्रथम येते, हे परफ्यूम कस्तुरीच्या वासासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही हे परफ्यूम लावून कुठेही जाल, लोक तुम्हाला नक्कीच विचारतील की तुम्ही कोणते परफ्यूम लावले आहे. यानंतर क्लाईव्ह ख्रिश्चन नं. १, हे जगातील सर्वात महाग परफ्यूमपैकी एक आहे. हे खरेदी करणे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते. त्यामुळे याबाबत अनेकांना आकर्षण असतं. गुच्ची ब्लूम यानंतर गुच्ची ब्लूमचा नंबर येतो, तो महिलांमध्ये खूप पसंत केला जातो. थोडक्यात सांगायचे तर हा ब्रँड महिलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या यादीतील पुढील नाव आहे टॉम फोर्ड औड वूड, हे परफ्यूम त्याच्या सुगंधासाठी खूप लोकप्रिय आहे. शनेल ५ हा एक प्रतिष्ठित परफ्यूम आहे. तो त्याच्या सदाबहार सुगंधासाठी लोकप्रिय आहे. जगातील महागड्या परफ्यूमच्या यादीत याचाही समावेश आहे. वर्साचे एरोस वर्साचे एरोसचे नाव देखील यामध्ये समाविष्ट आहे, संध्याकाळच्या पाट्यांसाठी याला प्राधान्य दिले जाते. जेम कलेक्शन- हे जेम कलेक्शन परफ्यूम भारतातील टॉप १० सर्वात महाग परफ्यूमपैकी एक आहे. डिओर सॉवेज त्याच्या ताज्या आणि मसालेदार सुगंधासाठी ओळखले जाते. त्यात बर्गामोट, काळी मिरी, लॅव्हेंडर आणि म्ब्रोक्सन इत्यादींच्या नोट्स आहेत. जो मेलोन लंडन मातीसारखा, सुगंधी आणि घट्टसर आहे. ज्यांना वृक्षांच्या सुगंधात स्वारस्य आहे त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. जे व्हेटिव्हर आणि सीडरवूड सारख्या नोट्स देते.