'लालपरी'चा प्रवास महागणार !

मुंबईदि. १२-

राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून आता प्रवाशांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. कारण लालपरीचा प्रवास महागणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटीची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. कर्मचाऱ्यांचे वाढते वेतनइंधन दरवाढ तसेच इतर सुट्या भागांची दरवाढ झाल्याने तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. यावरून एसटी महामंडळ प्रवाशांना झटका देण्याच्या तयारीत आहे. महामंडळाच्या प्रस्तावावर महामंडळाकडील बस पडताहेत अपुऱ्या

महामंडळाकडे सुमारे १४ हजार बस आहेतपरंतु त्या प्रवाशांसाठी अपुऱ्या पडत आहेत. त्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. याचा विचार करून निविदापात्र संस्थांनी नवीन बसचा वेळेत पुरवठा करणे आवश्यक होते. मात्रया संस्था बस पुरविण्याबद्दल सक्षम का नाहीतयाचा पाठपुरावा करून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याच्या सूचना भरत गोगावले यांनी महामंडळ प्रशासनाला दिल्या.

राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणारहे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाडेवाढीवर शिक्कामोर्तब होणार की प्रवाशांना दिलासा दिला जाणारहेही लवकरच स्पष्ट होईल. मागील काही वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्याने महामंडळ भाडेवाढीसाठी आग्रही आहे. त्यामुळे राज्यातील प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला

सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे संकेत गोगावलेंनी दिले आहेत. गोगावलेंनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. भंडारा व नाशिक येथील बसचा अपघात तसेच नुकत्याच बेस्ट चालकांकडून घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.