दहावीला ९२% गुण मिळवलेल्या मुलीला मुख्याध्यापक बापाने संपवले
.jpeg)
सांगली – सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात एक
धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या
रागातून वडिलांनी आपल्या १७ वर्षीय मुलीला जबर मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा
मृत्यू झाला असून संपूर्ण राज्यभरातून या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात
आहे. मृत मुलीचे नाव साधना भोसले असून, तिच्या वडिलांचे नाव धोंडीराम
भोसले आहे. ते स्थानिक माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. साधनाला NEET चाचणीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी तिची
झडती घेतली. साधनाने उत्तर दिलं, "तुम्ही कुठे कलेक्टर
झाला? तुम्हालाही कमी गुणच पडले होते ना?" या उत्तराने संतप्त झालेल्या धोंडीराम यांनी लाकडी खुंट्याने अमानुष
मारहाण केली. शुक्रवारी रात्री झालेल्या मारहाणीनंतरही साधनाला रुग्णालयात नेण्यात
आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील योगा डे कार्यक्रमासाठी निघून गेले, तर साधना घरातच बेशुद्ध पडली होती. नंतर तिला
रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित
केलं. साधना ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. दहावीला तिला ९२ टक्के गुण मिळाले
होते, आणि ती NEETसाठी मेहनत करत होती.
परंतु एका चुकलेल्या सराव चाचणीमुळे तिच्यावर होरपळून गेले. या प्रकरणी साधनाची आई
प्रीती भोसले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर सांगली पोलिसांनी
रविवारी धोंडीराम भोसले यांना अटक केली.