सोन्याची जेजुरी वेधतीय सर्वांचे लक्ष

गणपती बाप्पाचे  सर्वत्र वाजत-गाजत आगमन झाले असून अनेकांनी आपापल्या घरी सुंदर आणि आकर्षक देखावे साकारून लाडक्या गणरायाची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना केली आहे. प्रा. राखी चेतन राठोड यांनीही आपल्या बाळे, शिवशक्ती नगर येथील निवासस्थानी सोन्याची जेजुरी हा देखावा साकारला असून तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रा. राखी राठोड यांनी सोन्याची जेजुरी हा देखावा साकारताना पुट्ठा, कार्डशीट पेपर, रंग, डिंक, गोल्डन पेपर आदींचा वापर केला आहे. तसेच छोटी खेळणी, मूर्ती आदींचाही कल्पकतेने वापर केला आहे. याशिवाय रंगीबेरंगी विद्युतरोषणाई केली असून त्यामुळे देखाव्याच्या सौंदर्यात भरच पडत आहे. हा देखावा साकरण्यासाठी त्यांना दोन दिवसांचा कालावधी लागला आहे. प्रा. राखी राठोड या सौ. गोपीबाई रामकिसन ( बलदवा) हायस्कुल देगाव येथे कार्यरत आहेत.