गड आणि गडकिल्ल्यांतुन शिवरायांच्या पराक्रमाची अनुभूती होते.

पुणे : ज्यावेळी या गडकिल्ल्यांवर येतो, त्यावेळी एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. शिवाजी महाराजांचे किल्ले
फक्त पाहण्यासाठीच नाही तर त्यामुळे त्यांचा आणि मावळांचा पराक्रम देखील दिसतो.
देश विदेशात या गडकिल्ल्यांची लोकप्रियता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा किल्ले शिवनेरी येथे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,
अजित पवार यांच्या
उपस्थितीत बुधवारी सकाळी पार पडला. यावेळी शिंदे बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की,
शिवाजी महाराजांसारखा दुसरा कुठलाच आदर्श असू शकत नाही. किल्ले आणि
जुनी मंदिरे संवर्धन आम्ही सुरू केले. याठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना सुविधा
मिळाल्या पाहिजेत. कालच उद्योगमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांना सांगितले, एक टीम तयार करा आणि गडकिल्ल्यांचं सर्किट तयार करा त्याठिकाणी सर्व
सुविधा द्या. मी अगोदर मुख्यमंत्री होतो आणि आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री
आहेत आणि आम्ही सर्वजण टीम म्हणून या राज्याचा आणि किल्ल्यांचा विकास करू. युनेस्कोकडे
शिवनेरीचाही प्रस्ताव युनेस्कोकडे
शिवनेरीचाही प्रस्ताव दिल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. युनेस्कोकडे
राज्यातील 11 किल्ल्यांचा प्रस्ताव देण्यात आलाय. शिंदे म्हणाले, काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये तीन
युद्धनाैकांचे राष्ट्रअर्पण केले. त्यावेळी मोदींनी शिवाजी महाराजांच्या
पराक्रमाचा अभिमानाने उल्लेख केला, ही देखील आपल्यासाठी फार
अभिमानाची गोष्ट आहे.