श्री. न. फू. शहा कोठारी प्रशालेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव समारंभ उत्साहात संपन्न ..

सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशी  गुलाब पुष्प देऊन पुष्पवृष्टीने  स्वागत करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.रमेश यादवाड सर , प्रमुख पाहुणे म्हणून एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भरत चंदनशिव ,प्रसिद्ध उद्योगपती श्री.विलास बाबर उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून,हवेत फुगे सोडण्यात आले.प्रशालेच्या वतीने मान्यवरांचे शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी कु. फातिमा नदाफ, कु. राणी पुजारी , चि. मुद्दसर  मक्तेदार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आला.मुख्याध्यापक श्री.रमेश यादवाड सरांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या  उपक्रमाचे माहिती सांगून प्रास्ताविक केले.प्रमुख पाहुणे श्री.भरत चांदशिव यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्याचे फायदे तोटे सांगून मार्गदर्शन केले.प्रसिद्ध उद्योगपती श्री.विलास बाबर यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माने ए. एस.यांनी तर आभार श्री. बगले एस.एम. यांनी मानले.