देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही खासदार सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये

बीड: मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला माणुसकीच्या
नात्याने न्याय मिळायला पाहिजे. आज दोन महिने उलटून गेले. 69 दिवस झाले अजून न्याय
मिळालेला नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय मागितला आहे. कुणीही गुन्हेगार असला
तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे, देशमुख कुटुंबिय किंवा कुणीही आता
अन्नत्याग करु नये, पण वेळ पडल्यास आम्हीही अन्नत्याग करु.
सत्याचाच विजय झाला पाहिजे असं त्यांनी सांगितले. देशमुख कुटुंबियांना न्याय
मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही सुळे यांनी सांगितले. राज्यात बीडमधील सरंपच संतोष देशमुख हत्या
प्रकरण चर्चेत आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यांन
खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट सांत्वन केले.
देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग करु नये, त्यांचा लढा आता मी
लढणार आहे असे आश्वासनही यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिले. बीडमधील गुंडागर्दी
संपली पाहिजे. तानाजी सावंतांचा मुलगा सापडतो पण फरार कृष्णा आंधळे सापडत कसा
सापडत नाही असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. सुप्रिया ताई पुढे म्हणाल्या कि, मागील आठ दिवसांतील घटना अस्वस्थ करणाऱ्या हा राजकारणाचा विषय नाही आमचे राजकिय टोकाचे मतभेद आहेत.. देवेंद्रजी
सुसंस्कृत व्यक्तीमत्व आहे फडणवीसांकडून
अपेक्षा होती.. हे कुटुंब जेव्हा बोललं
तेव्हा आठ दिवसांत न्याय मिळेल असं वाटलं होतं. आठ दिवसा पूर्वी बजरंग सोनवणे आणि
मी अमित शहा यांना भेटून आलोत मी कुणाला भेटणार नाही.. कॉम्प्रमाइज करणार
नाही..सत्यमेव जयते सत्ता आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे ही गुंडागर्दी थांबली
पाहिजे माझा लेक घरी परत येईल का हे एका आईला वाटत असेल तर या साठी आम्हाला
स्वतंत्र मिळवले का वाल्मीक कराड व्हिडिओ काढून पोलिसांना सांगतोय की मी येत आहे
याला पैशाची मस्ती आहे.