बहुचर्चित चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेस १९ फेब्रुवारी पासून सुरुवात; क्रिकेट संघाना मिळणार छप्पर फाडके रक्कम

नवीदिल्ली: बहुचर्चित चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेस १९
फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. मिनी वर्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या
बहुचर्चित चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या संघासह
सहभागी क्रिकेट संघाना छप्पर फाडके रक्कम मिळणार आहे. हि स्पर्धा दोन गटात
होणार असून भारत आणि पाकिस्तानची टीम एकाच ए गटात आहेत.
क्रिकेट
चाहते आतुरतेने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा
सुरू होण्याची वाट पाहत आहेत. तब्बल 8 वर्षांनी
खेळल्या जाणाऱ्या आयसीसीच्या या स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारीला होणार आहे. तर 23 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान संघामधील महामुकाबला पार
पडेल. आता आयसीसीने स्पर्धेआधी पारितोषिक रक्कमेची घोषणा केली आहे. या स्पर्धेत
विजेत्या संघासोबतच पराभूत झालेल्या प्रत्येक संघालाही मोठी रक्कम मिळणार आहे.
आयसीसी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या
विजेत्या संघाला तब्बल 2.24 मिलियन
डॉलर (जवळपास 20 कोटी
रुपये) एवढी बक्षीसाची रक्कम मिळणार आहे. 9 मार्चला
विजेत्या संघाला ट्रॉफीसोबतच ही रक्कम दिली जाईल. याशिवाय, उपविजेत्या संघाला 1.12 मिलियन
डॉलर आणि सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या प्रत्येक संघाला 5.60 लाख डॉलर्स एवढी रक्कम दिली जाईल. यंदाची एकूण बक्षीस
रक्कम 6.9 मिलियन डॉलर एवढी आहे. 2017 च्या
स्पर्धेच्या तुलनेत रक्कम 53 टक्क्यांनी
वाढली आहे.
एवढेच
नाही तर प्रत्येक गट सामन्यातील विजयी संघाला 34,000 डॉलर
दिले जातील. 5-6व्या
स्थानावरील संघाला 3,50,000 डॉलर तर
7-8 व्या स्थानावर आलेल्या संघांना प्रत्येकी 1,40,000 डॉलर मिळतील. याशिवाय, आयसीसी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये
सहभागी होणाऱ्या 8 संघाला
प्रत्येकी 1,25,000 डॉलर
एवढी रक्कम दिली जाणार आहे.
ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संपूर्ण
वेळापत्रक
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (नॅशनल
स्टेडियम, कराची)
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत (दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (नॅशनल
स्टेडियम, कराची)
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी
स्टेडियम, लाहोर)
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत (दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (रावळपिंडी
क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
(रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी
स्टेडियम, लाहोर)
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (रावळपिंडी
क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गद्दाफी
स्टेडियम, लाहोर)
01 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
02 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय
क्रिकेट स्टेडियम, दुबई)
04 मार्च- उपांत्य फेरी 1, दुबई
05 मार्च- उपांत्य फेरी 2, लाहोर
09 मार्च- अंतिम सामना- लाहोर/दुबई
चॅम्पियन्स
ट्रॉफीसाठी गटविभागणी –
अ गट- पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश.
ब गट- दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड.
------------------------------------
डोनाल्ड
ट्रम्प म्हणाले, “वुई मिस
यू”!
पंतप्रधान
मोदी यांचे अमेरिकेत जल्लोषात
स्वागत
वाशिंग्टन
: दोन दिवसांचा अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वत्र
जल्लोषात स्वागत झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींनी भेट
घेतली. यावेळी वुई मिस यु अशा शब्दात ट्रम्प यांनी मोदी यांचे स्वागत केले.
या
भेटीनंतर दोघांनी नियोजित कार्यक्रमानुसार संयुक्त पत्रकार परिषददेखील घेतली. या
पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय परस्पर सहकार्याची
ग्वाही दिली. यावेळी मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या
प्रत्यार्पणावर डोनाल्ड ट्रम्प यांनी हिरवा कंदील दाखवला. त्याचवेळी भारताला F35 फायटर जेट पुरवण्याचा करार यावेळी अंतिम करण्यात आल्याचं
डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
-----------------------------