शेअर बाजारातील घसरण कायम
.jpeg)
मुंबई : भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरूच आहे. या
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार घसरणीसह उघडला. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई
निफ्टीची आज सकाळी लाल रंगात सुरुवात झाली. आज सकाळी सेन्सेक्स 490 अंकांच्या घसरणीसह 76000 अंकांच्या खाली उघडला.
सकाळी 10.15 वाजता यात 381 अंकांची
घसरण दिसून आली. तर निफ्टी50 इंडेक्स 171 अंकांनी घसरून 22,921.20 वर पोहोचला.या आठवड्यात
देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र, बाजाराची
सुरुवातच घसरणीसह झाली आहे. Zomato, Adani Ports, Tata Motors या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती देखील मोठ्या प्रमाणात
घसरल्या.ट्रेडिंग सुरू असताना, BSE लार्ज कॅपमध्ये समाविष्ट
असलेल्या 30 पैकी 28 समभागांनी लाल
रंगात व्यवहार सुरू केला. यामध्ये सर्वाधिक घसरण ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी
झोमॅटोच्या शेअर्समध्ये पाहायला मिळाली. मागील आठवड्याभरापासून या शेअरमध्ये घसरण
सुरूच आहे. सकाळी 10.15 वाजता कंपनीचे शेअर्स 3.18 टक्क्यांनी घसरून 208.75 रुपयांवर आले.याशिवाय,
Adani Ports, IndusInd Bank आणि Tata Motors या
कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 2 टक्के घसरण दिसून आली आहे.
मिडकॅपमधील कंपन्या एआयू बँकमध्ये आज सकाळी 7.81 टक्के,
आयडीएफसी फर्स्ट बँकमध्ये 7 टक्के आणि
पेटीएमच्या शेअर्समध्ये 5.43 टक्के घसरण दिसून आली.