सहकार क्षेत्रातून देशाची समृद्धी शक्य – खासदार रमेश जिगजिणगी*

विजयपूर – सहकार भारती ही एक राष्ट्रीय संघटना असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून देशाची समृद्धी साधता येते, असे प्रतिपादन खासदार रमेश जिगजिणगी यांनी केले. विजयपूर जिल्हा सहकार भारती कर्नाटक विजयपूर जिल्हा नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ शहरातील भावसार सांस्कृतिक भवनात पार पडला. यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार जिगजिणगी म्हणाले की, सहकारी संस्थांमध्ये लोकांनी गुंतवलेला पैसा हा सार्वजनिक पैसा असून तो सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक संचालकावर असते. जर हा पैसा विनाचाचपणी आणि नियमबाह्य पद्धतीने कर्ज म्हणून दिला गेला, तर सहकारी संस्थांचे महत्त्व कमी होऊन संस्थेचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते असेही त्यांनी सांगितले याच कार्यक्रमात खासदार रमेश जिगजिनगी यांनी केंद्र सरकारने कालच जाहीर केलेल्या नवीन सहकार धोरणाची माहिती असलेले माहिती दस्तावेज सहकार भारतीचे राष्ट्रीय संरक्षक व राज्य पदाधिकारांकडे सुपूर्त केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सहकार भारतीचे राष्ट्रीय संरक्षक रमेश वैद्यजी यांनी सांगितले की, मूल्याधारित सहकार क्षेत्राला केंद्र सरकार अधिक महत्त्व देत असून, त्यामुळे देश आर्थिकदृष्ट्या बळकट होईल. आणखी एक प्रमुख पाहुणे, माजी विधान परिषद सदस्य अरुण शाहापुर यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘सहकार भारती’ या नावामध्येच जातीयतेपासून मुक्त आणि पक्षविरहित संघटनेचा संदेश आहे. सहकाराच्या माध्यमातून सर्व काही शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात श्रीहर्षगौडा पाटील यांची नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून, दीपक शिंत्रे यांची जिल्हा संघटना कार्यवाह तर परशुराम चिंचली यांची जिल्हा मुख्य कार्यवाह म्हणून घोषित करण्यात आले. या नियुक्त्यांची घोषणा सहकार भारतीचे राज्याध्यक्ष प्रभुदेव आर. मागनूर यांनी केली आणि त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सहकारी ध्वज प्रदान करुन अधिकार हस्तांतरित करण्यात आले याच कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक बसवराज यलगार यांनी बसवण्णांचा वचन साहित्य इंग्रजीत अनुवादित करून ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करुन गौरविण्यात आले निवृत्त अध्यक्ष डॉ. आर. आर. नायक यांनी नूतन अध्यक्षांकडे पदभार सोपवला. पदभार स्वीकारताना श्रीहर्षगौडा पाटील यांनी सांगितले की, ही जबाबदारी मी सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार असून गावापासून शहरापर्यंत प्रत्येकाला सहकारी क्षेत्रात सहभागी करून घेण्यावर भर देईन असे सांगितले या वेळी राज्य कार्यवाह नरसिंह कामत, जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजशेखर गुडदिन्नी, एम. जी. पाटील, व्ही. डी. इजेरी, श्रीमंत इंडी, चंद्रशेखर कवटगी, राजेश देवगिरी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांना सहकारी शाल घालून नियुक्ती पत्र देण्यात आले. हजारो सहकारी सदस्यांनी या समारंभात सहभागी झाले होते महिलांना सहकारी शाल घालून गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माजी अध्यक्ष आर. आर. नायक यांच्या स्वागताने झाली. बेळगाव विभागाचे राज्य प्रमुख कार्यवाह सुभाष इंडी यांनी जिल्हा समिती, तालुका समिती पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवराज साहकार यांनी शेवटी बी.के पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.