द कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 : फ्रान्समध्ये सुरु झाला जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सव

फ्रान्स, १३ मे :
ऑस्करनंतर जगातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘कान्स चित्रपट महोत्सव २०२५’ (Cannes Film Festival 2025) फ्रान्समध्ये भव्य स्वरूपात सुरू झाला आहे. १३ मेपासून सुरू झालेला हा महोत्सव २४ मे २०२५ पर्यंत रंगणार आहे. या वर्षी हा महोत्सव ७३ व्या वर्षात पदार्पण करत असून, जगभरातील सिनेसृष्टीचे लक्ष याकडे लागले आहे.

रेड कार्पेटवर बॉलिवूडचा जलवा

हॉलिवूड कलाकारांसोबतच यंदा देखील बॉलिवूड कलाकार कान्सच्या रेड कार्पेटवर आपली उपस्थिती नोंदवत आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने अॅाफ-शोल्डर ग्लॅमरस गाऊन परिधान करून कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री घेतली. तिचा क्रिस्टल पॅरट क्लच, ज्याची किंमत सुमारे ४.५ लाख रुपये आहे, चर्चेचा विषय ठरला. या वर्षी ऐश्वर्या राय बच्चन, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा आणि दीपिका पादुकोण याही कान्समध्ये सहभागी होणार आहेत.

भारतीय चित्रपट आणि दिग्दर्शकांची उपस्थिती कान्समध्ये यंदा ५ हिंदी चित्रपटांची निवड झाली असून, त्यात होमबाउंड’, ‘अरणेयर दिन रात्री’ (१९७०), ‘चरक’, ‘तन्वी द ग्रेट’ आणि ‘अ डॉल मेड ऑफ क्ले’ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट’ फेम दिग्दर्शिका पायल कपाडिया या वर्षी कान्समध्ये ज्युरी म्हणून सहभागी झाल्या आहेत. त्यांनी ज्युलिएट बिनोचे, जेरेमी स्ट्रॉंग, हॅले बेरी यांसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत रेड कार्पेटवर झळकून भारताचे प्रतिनिधित्व केले.

कान्स महोत्सवाचे वैशिष्ट्य

हा महोत्सव मुख्यतः चित्रपट उद्योगातील व्यावसायिकांकरिता आयोजित केला जात असला तरी काही स्क्रिनिंग आणि उपक्रम सामान्य जनतेसाठी खुले असतात. सिनेमा डे ला प्लेज” (Beach Cinema) सारख्या उपक्रमांतून सिनेमाप्रेमींना चित्रपट पाहण्याची संधी मिळते.

पुरस्कार आणि रक्कम

कान्स चित्रपट महोत्सवात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे निर्णय तीन सदस्यीय ज्युरी घेते.

  • प्रथम क्रमांकासाठी : €१५,०००
  • द्वितीय क्रमांकासाठी : €११,०००
  • तृतीय क्रमांकासाठी : €,५००
    संयुक्त विजेते असल्यास बक्षीसाची रक्कम विभागली जाते.