जनतेत जिंकलेल्या लढ्याची न्यायालयातही जीत; राजकीय प्रभावाखाली निर्णय घेणार्‍या सरकारी यंत्रणेला धडा

ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अपर तहसील कार्यालय अनगर होत असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. शिवात तातडीने या संदर्भात 24 जुलै 2024 रोजी शासकीय आदेश -जीआरही काढून निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढे मोहोळ विधानसभेची निवडणूक याच मुद्या भोवती फिरत राहीली. आणि अपर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या हमीवरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजू खरे आमदार झाले. मोहोळ तालुक्याच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेला अनगर अपर तहसील कार्यालयाचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई उच्चन्यायालयाने सोमवारी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. जनतेच्या न्यायालयात खरे यांनी विजय मिळवला. आता जनतेत जिंकलेल्या लढ्याची न्यायालयातही जीत मिळाली आहे. राजकीय प्रभावाखाली निर्णय घेणार्‍या सरकारी यंत्रणेलाही न्यायालयाने या निकालातून धडा दिल्याचे मानले जात आहे. अनगर अप्पर  तहसील संदर्भात महाराष्ट्र शासनाने 24 जुलै 2024 रोजी काढलेला अध्यादेश- जीआर सोमवारी मुंबई येथे उच्च न्यायालयाने रद्द केला. याशिवाय जमीन महसूल संहितेच्या चौथ्या कलमाचे पालन न केल्याने अनगर अप्पर तहसील हे रद्दबातल केल्याचे स्पष्ट केले. भविष्यात अशा पद्धतीने जर कार्यालयाची निर्मिती करायची असेल तर विहित प्रचलित कायद्याचे पालन करावे, अशी निरीक्षण न्यायालयाने नोंदवली आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने राजकीय प्रभावाखाली घाई गडबडीत निर्णय घेणार्‍या सरकारी यंत्रणेला चांगलाच धडा दिल्याचे मानले जात आहे.

मोहोळ तालुक्यात मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय हे अनगर या ठिकाणी हलवण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यातून त्याला विरोध झाला, तरीही त्या ठिकाणी तहसील कार्यालय सुरू करण्यात आले. दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा प्रकर्षाने गाजला आणि आमदार यशवंत माने यांचा पराभव झाला. राजू खरे आमदार झाले. त्यांच्या पराभवाला अनगर अप्पर तहसील कार्यालय हे कारणीभूत ठरल्याचे दिसून आले. आमदार राजू खरे यांनी पहिल्याच अधिवेशनात हे तहसिल कार्यालय रद्द व्हावे यासाठी आंदोलन करित लक्ष वेधले होते. निवडणूकीचा मुद्दा सभागृहातही चर्चेत आणण्यात राजु खरे यशस्वी ठरले. माजी आमदार राजन पाटील आणि तत्कालीन आमदार यशवंत माने यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रतिष्ठा पणाला लावून अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून आणले. अनगर अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला आहे. या कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी जमीन महसूल संहितेचे पालन न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. अनगर अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात  महाराष्ट्र सरकारने 24 जुलै 2024 रोजी काढलेला अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींनी आज रद्द केला आहे. जमीन महसूल संहिता सेक्शन चारचे पालन न केल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने आज अनगर अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय रद्दबातल ठरवला आहे. भविष्यात अशा पद्धतीने अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करायची असेल, तर विहित प्रचलित कायद्याचे पालन करावे, अशी ताकीदही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे, त्यामुळे राज्य सरकारने चार महिन्यांपूर्वी घेतलेला निर्णय रद्द झाल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही नामुष्की ओढावली आहे. अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी मोहोळ तालुका संघर्ष बचाव समितीच्या झेंड्याखाली एकत्र आले होते. तसेच, शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर, संतोष पाटील, तसेच काही वकिलांच्या माध्यमातून अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायायलात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा राज्य सरकारचा अध्यादेश रद्द केला आहे. तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 12 सप्टेंबर 2024 पासून अनगर अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू झाले होते. त्या वेळी सर्वपक्षीयांचा विरोध मोडीत काढून यशवंत माने आणि राजन पाटील यांनी मोठ्या अट्टाहासाने अनगरला तहसील कार्यालय सुरू केले होते. अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र येत मोहोळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तसेच, विविध प्रकारची आंदोलनेही करण्यात आली होती. राजन पाटील, यशवंत माने आणि सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते. विशेषतः यशवंत माने आणि उमेश पाटील यांच्यात एकेरीवर येत वाद झाला होता. उच्च न्यायालयात अनगर अप्पर तहसिलचा खटला रद्द होऊन निकाली निघाल्याने सत्ताधारी पाटील आणि माने या माजी आमदार व्दयांचा जनतेच्या न्यायलयानंतर आता उच्च न्यायालयातही दणका बसला आहे.

- चन्नवीर भद्रेश्वरमठ -9922241131