"मेकअपमधून पात्रांना ‘जिवंत’ करणारा कलाकार गेला..." विक्रम गायकवाड
.jpeg)
मुंबई : सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध आणि सात वेळा
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन झाले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने मराठी, हिंदी आणि बंगाली सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. आज (बुधवार) दुपारी 4.30 वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत
त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विक्रम गायकवाड यांनी आपल्या कारकिर्दीत हिंदी, मराठी आणि बंगाली अशा विविध भाषांतील अनेक ऐतिहासिक व वास्तववादी सिनेमांसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले. त्यांच्या सर्जनशीलतेमुळे त्यांनी रंगवलेली पात्रं अधिक
जिवंत आणि वास्तवदर्शी वाटायची.