माकपचे 24 वे सोलापूर जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न.. नूतन जिल्हा सचिवपदी कॉम्रेड कॉ.युसुफ शेख (मेजर) यांची निवड.

सोलापूर :-  भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी ) चे 24 वे सोलापूर जिल्हा अधिवेशन माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ.अशोक ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे मध्यवर्ती दत्तनगर  पार पडले. या  अधिवेशनाच्या सुरूवात जेष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते पक्षाचा लाल झेंडा फडकावून व शहीद स्तंभास अभिवादन करून करण्यात आली. या अधिवेशनाचे उद्घाटन पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ अशोक ढवळे यांनी केले. यावेळी  बोलताना म्हणाले की, भाजप आरएसएस ने या देशात सातत्याने फूट पाडण्याचे काम केले आहे. धर्माच्या जातीच्या आधारावर निवडणुका लढवून सत्तेत आली आहे. कामगार, शेतकरी धोरणे राबविणे, लोकशाही,संविधान मूल्यांना पायदळी तुडवने काम करत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे मोठे बदल सूरु आहेत त्याचा फटका आपल्या देशाला देखील बसत आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्येत आल्यानंतर आयात धोरणात आमूलाग्र बदल केल्याने भारताला मोठा फटका बसणार आहे. असे असताना मोदी सरकारने मात्र डोनाल्ड ट्रम्प ला पूरक धोरण राबविण्याचे पूर्वीपासून प्रयत्न केले आहेत. त्यामुळें या धोरणाला विरोध करीत धर्मनिरपेक्ष लोकशाही संविधान मूल्यांना मानणाऱ्या जनतेची एकजूट आपणाला उभी करावी लागणार आहे. ते पुढे म्हणाले. सोलापूर हा लढाऊ जिल्हा या जिल्ह्यात मार्शल ला झाला इंग्रजाविरुद्ध जनतेने एकजूट होत उठाव केलेला या जिल्ह्यात चार हुतात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, आंतरराष्ट्रीय मानवतावादी विचार रुजवणारा डॉक्टर कोटणीस यांचा हा जिल्हा आजही चीनमध्ये डॉक्टर कोटणीस यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आदर्श मानतात. असा हा वारसा लाभलेला ऐतिहासिक जिल्हा आहे इथल्या कष्टकरी कामगारांनी कामगार चळवळ उभी करण्याचे काम केले आहे. उद्घाटनानंतर जिल्हा सचिव ॲड एम एच शेख यांनी मागील तीन वर्षाचा कार्याचा अहवाल अधिवेशनासमोर मांडला. या अहवालावर अधिवेशनात उपस्थित प्रतिनिधी चर्चा केली व अहवालास मंजुरी दिली.  त्यानंतर नूतन जिल्हा कमिटीचे गठन करण्यात आले. या अधिवेशनात माकपच्या नूतन जिल्हा सचिव पदी  कॉम्रेड युसुफ शेख (मेजर) यांची एकमताने निवड करण्यात आली. या अधिवेशनास निरीक्षक म्हणून राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ अजित नवले आणि कॉ सुनिल मालुसरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी या अधिवेशनास मार्गदर्शन केले.हे अधिवेशन चालवण्यासाठी विविध समितीचे गठण करण्यात आले होते.  अध्यक्ष मंडळ - कॉ नसीमा शेख, कॉ रंगप्पा मरेडी, कॉ.सुनंदा बल्ला, मिनिट्स कमिटी - कॉ दत्ता चव्हाण, कॉ.अब्राहम कुमार, मल्लेशम कारमपुरी, तर क्रेडेशियल कमिटी- ॲड.अनिल वासम, किशोर मेहता, अमित मंचले यांनी काम पाहिले.

श्रध्दांजली प्रस्ताव कॉ इलियास सिद्दीकी यांनी मांडले. या अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात  आले.यामध्ये वाढत्या जातीय वाढविरोधात लढा , बेरोजगारी,महागाई , विडी कामगारांचे सुधारित वेतन साठी लढा,स्मार्ट/प्रीपेड मिटर विरोधात लढा, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा इत्यादी ठराव मांडण्यात आले.  पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य व किसान सभा जिल्हाध्यक्ष डॉ शिवानंद झळके यांचे आकस्मिक निधन झाले होते त्यांच्या कुटुंबीयास दोन लाख रुपये आर्थिक निधी मदत म्हणून यावेळी देण्यात आली. यावेळी नूतन जिल्हा सचिव पदी कॉ. युसुफ शेख मेजर यांची निवड करण्यात आली. या अधिवेशनाचा समारोप करताना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर म्हणाले की, वर्ग संघर्ष आणि जनतेचे सामाजिक ,आर्थिक प्रश्नांवर लढाई तीव्र करा. आपल्या समोर धर्मांध आणि सांप्रदायिक ध्रुवीकरणाचे आव्हान आहे.त्याला टक्कर देण्यासाठी संविधान आणि लोकशाहीची मूल्ये संवर्धित करण्याचा निर्धार करा. अधिवेशनात प्रजा नाट्य मंडळ कलापथकातील प्रशांत म्याकल, विशाल पवार, अरुण सामल, चंद्रकांत मंजुळकर आदी शाहिरांनी क्रांतिकारी गीते सादर करून स्फुलिंग चेतावले.