ठाकरे बंधू एकत्र – महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवला गेला. अनेक वर्षांच्या राजकीय दुराव्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू प्रथमच एका संयुक्त निमंत्रणपत्रिकेवर एकत्र झळकले आहेत. हा ‘विजयी जल्लोष मेळावा’ ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील NSCI डोम, वरळी येथे होणार असून, याचे आयोजन हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात यश मिळवल्यानंतर करण्यात आले आहे. संजय राऊत यांनी आज (दि. १) ट्विटरवरून हे निमंत्रणपत्रक शेअर करत या ऐतिहासिक घडामोडीची माहिती दिली. mराजकीय ऐक्याची नांदी की केवळ जल्लोष? राज आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येणार असल्यामुळे हा मेळावा केवळ मराठी जनतेच्या विजयाचा सण आहे की भविष्यातील संयुक्त राजकीय समीकरणांची नांदी, यावरून चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही वर्षांतील हा पहिलाच प्रसंग आहे, जिथे ठाकरे बंधू एकत्र येणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या ऐतिहासिक पुनर्मिलनाकडे लागले आहे. संयुक्त अपील : आम्ही वाट बघतोय! पत्रात दोघांनी म्हटले आहे की, "सरकारला नमवलं का? तर हो नमवलं! कोणी नमवलं? तर तुम्ही – मराठी जनतेनं! आम्ही केवळ तुमच्या वतीने संघर्ष करत होतो… आता आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे… आम्ही आयोजक आहोत, पण जल्लोष तुम्हालाच करायचा आहे… आम्ही वाट बघतोय!" NSCI डोमवर तयारीचा धडाका मेळाव्याच्या तयारीसाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र NSCI डोमवर पाहणी करणार आहेत. रात्री ९.३० वाजता ही पाहणी होणार असून जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात अनेक नामवंत नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील.