बागलकोटजवळ दोन कारमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

विजयपूर - हुनगुंद तालुक्यातील अमिनगड जवळ अपघातात तीन जण ठार बागलकोट हुन्नगुंद तालुक्यातील अमिनगड जवळ दोन कारांच्या समोरासमोरील धडकेत झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत गंभीर जखमी झालेल्या बागलकोट शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वीरश अंगडी (वय ५४) यांचे मृत्यू झाला आहे. तर संदीश वीरश अंगडी (वय १८) आणि गंगम्मा वीरश अंगडी (वय ५०) यांचा मृत्यू अपघाताच्या ठिकाणीच झाला होता. यांचाच आणखी एक मुलगा सतीश (२८) हा जीवघेण्या अपघातातून बचावला आहे. आज सकाळी हा अपघात घडला. या अपघातात कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांपैकी आई आणि मुलगा घटनास्थळीच मरण पावले. तर वीरश अंगडी यांचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात अमिनगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. दुसऱ्या कारचा चालकही जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बदामी तालुक्यातील नेलुगी गावचे रहिवासी आहेत. अमिनगड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

दिपक शिंत्रे