मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! ब्रेक फेल झाल्याने २० गाड्यांचा चुराडा – अनेक जखमी

पुणे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटात दत्ता फूडमॉलजवळ शनिवारी (ता. २६) सकाळी एक भीषण अपघात घडला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे18 ते 20 वाहने एकमेकांवर आदळली. तीन वाहने पूर्णपणे चुरडली गेली असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

हा महामार्ग देशातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक असून, दररोज सुमारे दीड लाख वाहने ये-जा करतात. अपघातानंतर ४ ते ५ किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले असून, जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर केला जात आहे, मात्र संपूर्ण घाट भागामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.