भिगवणमध्ये यात्रा नियोजन बैठकीत गोंधळ; ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की, पोलिसांसमोरच वाद

भिगवण | ११ एप्रिल:-भिगवण येथे नियोजित
यात्रेसंदर्भातील बैठकीदरम्यान दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण होऊन त्याचे
पर्यवसान थेट धक्काबुक्कीमध्ये झाले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसीलदार, नायब तहसीलदार आणि धर्मादाय
आयुक्तांच्या समोरच घडला, ज्यामुळे प्रशासनाच्या
कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बैठकीत यात्रेच्या आयोजनावरून मतभेद झाले आणि वातावरण
चिघळले. यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्कीचा
सामना करावा लागला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
यावेळी पोलीस घटनास्थळी उपस्थित असतानाही
कोणतीही त्वरित कारवाई झाली नाही, हे विशेष उल्लेखनीय ठरले. पोलीस बंदोबस्ताचा अभाव, तणाव निर्माण घटनेनंतर परिसरात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “वेळीच पोलिसांनी योग्य ती सुरक्षा पुरवली असती, तर ही घटना घडली नसती,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले
आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी
होणार का, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.