लाडक्या लेकीच्या नावाने चिठ्ठी लिहून शिक्षकाची आत्महत्या; आरोपींचा स्पष्ट उल्लेख

शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी
आत्महत्येपूर्वी फेसबुकवर शेवटची पोस्ट लिहून आपल्या लाडक्या लेकीला उद्देशून
भावनिक संदेश दिला.
"श्रावणी बाळा,
तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर. मी माफी मागायच्या लायकीचा
नाही. तुझ्या बाबतीत खूप स्वप्नं पाहिली होती, पण त्या
स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले."
"मी कधीही
कोणाचे नुकसान केले नाही, पण काही लोकांनी मला छळले. आता ते
मला हालहाल करून मारणार होते."
आरोपींचा उल्लेख:
धनंजय नागरगोजे यांनी आपल्या
चिठ्ठीत खासगी वाद किंवा अन्य कारणांमुळे छळ केल्याचा आरोप करत सहा लोकांची नावे
दिली आहेत.
- विक्रम
बाबुराव मुंडे
- विजय
विक्रम मुंडे
- अतुल
विक्रम मुंडे
- उमेश
रमेश मुंडे
- गोविंद
नवनाथ आव्हाड
- ज्ञानेश्वर
रजेभाऊ मुरकुटे
पोलिसांची कारवाई:
- पोलिसांनी
मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.
- चिठ्ठी
आणि फेसबुक पोस्टच्या आधारे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
सुरू आहे.
- घटनेच्या
अधिक तपासासाठी पोलिसांची टीम तैनात.
सार्वजनिक प्रतिक्रिया: स्थानिक नागरिक व शिक्षक संघटनांकडून संताप आणि दु:ख व्यक्त केले जात आहे. राज्य सरकारने विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी.