Tata Capital Mega IPO: टाटा कॅपिटलचा 15,000 कोटींहून अधिकचा मेगा IPO प्रक्रियेला सुरुवात

मुंबई: टाटा समूहाच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपनी टाटा कॅपिटलने शेअर बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीला सुरुवात केली असून, कंपनीने गोपनीय प्री-फायलिंग मार्गाने सेबीकडे IPO साठी कागदपत्रे दाखल केली आहेत. हा IPO 15,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

टाटा कॅपिटल बनली आठवी मोठी कंपनी गोपनीय फायलिंग करणारी
टाटा प्ले, ओयो, स्विगी, विशाल मेगामार्ट, क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस, इंदिरा आयव्हीएफ आणि फिजिक्सवाला या कंपन्यांनंतर टाटा कॅपिटलनेही गोपनीय प्री-फायलिंग मार्ग स्वीकारला आहे.
31 मार्च 2024 पर्यंत टाटा सन्सचा टाटा कॅपिटलमधील हिस्सा 92.83% होता. उर्वरित हिस्सा IFC आणि टाटा समूहाच्या इतर संस्थांकडे होता.
टाटा सन्स आणि IFC या दोघांनी त्यांचा हिस्सा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

10 गुंतवणूक बँकांची नियुक्ती
टाटा कॅपिटलने IPO प्रक्रियेसाठी 10 प्रमुख गुंतवणूक बँकांची नियुक्ती केली आहे:

  • कोटक महिंद्रा कॅपिटल
  • सिटी
  • जेपी मॉर्गन
  • अॅक्सिस कॅपिटल
  • ICICI सिक्युरिटीज
  • HSBC सिक्युरिटीज
  • IIFL कॅपिटल
  • BNP परिबा
  • SBI कॅपिटल
  • HDFC बँक

IPO पूर्वी ₹1,504 कोटींचा राइट्स इश्यू
25 फेब्रुवारी रोजी टाटा कॅपिटलच्या बोर्डाने IPO योजनेला मंजुरी दिली होती.
IPO लाँच करण्यापूर्वी ₹1,504 कोटी उभारण्यासाठी राइट्स इश्यू मंजूर करण्यात आला होता.