स्वर्णिमा योजना: मागासवर्गीय महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

नवी दिल्ली :- महिला उद्योजकांसाठी केंद्र
सरकारने आणलेली स्वर्णिमा योजना म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया मोहिमेच्या
दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या
माध्यमातून या योजनेद्वारे मागासवर्गीय महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची
संधी मिळणार आहे.
कर्जाची वैशिष्ट्ये:
- ₹२ लाखांपर्यंतचे कर्ज
- फक्त ५% व्याजदर
- स्वतःची कोणतीही गुंतवणूक आवश्यक नाही
- स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन
महिला सशक्तीकरणाला चालना:
या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळेल. व्यवसाय
सुरू करण्यासाठी लागणारा आर्थिक अडथळा दूर होईल. याशिवाय, मागासवर्गीय महिलांना स्वावलंबन मिळवण्याची संधी मिळणार आहे.
अर्ज कसा करावा?
- इच्छुक महिलांनी राष्ट्रीय मागासवर्गीय
वित्त आणि विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
- कर्ज मंजुरी प्रक्रियेनंतर रक्कम थेट
खात्यात जमा होईल.