सोलापुरात तरुणाची संशयास्पद आत्महत्या; चिठ्ठीमुळे जबाबदारावर गंभीर आरोप

सोलापूर – "मेरे को बहुत
तकलीफ दिया, बहुत ब्याज लिया,
मुझे मिलने के बाद मारा, गाली दिया"
अशा मजकुराची चिठ्ठी आढळून आल्याने सोलापुरात मेहबूब अब्दुल हक कुरेशी या
तरुणाच्या आत्महत्येला नवे वळण मिळाले आहे. विजयलक्ष्मी नगरातील राहत्या घरात
त्याने गळफास घेतला. चिठ्ठीत जब्बार शेख याचं नाव असल्याने कुटुंबीयांनी
त्याच्यावर त्रासाचा आरोप केला आहे. पोलिस तपासात मृत तरुणाला लिहिता-वाचता येत
नसल्याचं स्पष्ट झाल्याने चिठ्ठी कोणी लिहिली याची चौकशी सुरू आहे. पोलीस
निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी याबाबत माहिती दिली आहे. |