काँग्रेस कमिटी शहर कार्याध्यक्ष पदी सुशील बंदपट्टे यांची निवड,कार्यकर्त्यामध्ये उत्साह

सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या शहर कार्याध्यक्ष पदी युवा नेते सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शिफारसी नुसार, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार सुशील बंदपट्टे यांची सोलापुर शहर कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, सदर निवडीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले, सुशील बंदपट्टे यांनी काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहून काम केले आहे, तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी धावून येतात, चंद्रनील फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत शालेय मुलांना शालेय साहित्य वाटप, गोरगरीब लोकांना धान्य वाटप केले आहे, , तसेच लोकांसाठी आधार कार्ड,, मतदान कार्ड मोफत शिबीर राववले आहेत, तसेच सुशील बंदपट्टे यांच्यातर्फ चंद्रनील फाउंडेशन च्या माध्यमातून दहीहंडी उत्सव देखील मोठया प्रमाणात साजरा केला जातो, तसेच शहरातील नागरिकांसाठी रस्ते, पाणी, लाईट या विषयावर अनेकवेळा आंदोलने करून कामे मार्गी लावली आहेत, तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या एका युवा कार्यकर्त्याला शहर काँग्रेस कमिटीचने शहर कार्याध्यक्ष पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, काँग्रेस मध्ये एकनिष्ठ राहून कोणत्याही पदाची अपेक्षा न करता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवत लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढे देखील आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असून, तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे नुतन कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी सांगितले यावेळी काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, दत्ता सुरवसे, सुनील रसाळे, गणेश डोंगरे, राजाभाऊ कलकेरी, ,दीपक जाधव, महेश अलकुंटे, दत्तात्रय अलकुंटे, ,संतोष इरकल, गोपाळ पाथरूट,श्याम मुद्दे ,अशोक यमपूरे ,भीमाशंकर बंदपट्टे, श्रीनिवास यमपूरे, जयवंत यमपूरे ,राहुल भरले ,अतिश अलकुंटे कुणाल भांडेकर ,नरेंद्र अलकुंटे समस्त वडार समाज व चंद्रनील मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते