सूर्यकुमार यादवचं नाबाद ७३ रनचं जबरदस्त प्रदर्शन

मुंबई : IPL 2025 च्या
प्लेऑफ रेसमध्ये मुंबई इंडियन्सने अखेरची जागा पटकावली आहे. दिल्ली
कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या निर्णायक सामन्यात मुंबईने ५९ धावांनी दणदणीत विजय मिळवत
अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले. यापूर्वी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले
होते. सूर्या-नमनने खेळले 'गेम चेंजर' रोल
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत १८१ धावा केल्या. सुरुवातीला संथ
वाटणारी ही धावसंख्या, शेवटच्या दोन
षटकांत सूर्यकुमार यादव (नाबाद ७३) आणि नमन धीर (नाबाद २४) यांच्या धडाकेबाज
खेळीमुळे मोठी झाली. फक्त दोन षटकांत ४८ धावा करत त्यांनी सामन्याचा मोर्चाच
फिरवला. सूर्यकुमारने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ४३ चेंडूंमध्ये नाबाद
७३ धावा केल्या, तर नमनने फक्त ८ चेंडूंमध्ये २ चौकार आणि २ षटकार
मारत नाबाद २४ धावा जोडल्या. दिल्लीची फलंदाजी कोलमडली १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग
करताना दिल्ली कॅपिटल्सची अवस्था फारच खराब झाली. मुंबईच्या मिचेल सँटनरने मध्य
फळीला खिंडार पाडले, तर अन्य
गोलंदाजांनी त्याला उत्तम साथ दिली. संपूर्ण दिल्ली संघ फक्त १२१ धावांवर ऑलआऊट झाला.
मुंबईकडून एकूण गोलंदाजांनी दिल्लीला एक क्षणही सावरू दिला नाही. दिल्लीकडून मुकेश
कुमारने २ विकेट्स घेतल्या, तर चामीरा, मुस्तफिजूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी १ यश मिळाले.