सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला फटकारले; त्याच्या कुजक्या मेंदूने उलटी केली

नवी दिल्ली: आई-वडिलांच्या प्रणयाबद्दल अतिशय हिणकस भाष्य करणाऱ्या
रणवीर अलाहाबादीस याला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. मंगळवारी सकाळी
झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग
यांच्या पीठाने युट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्या विधानाचा समाचार घेतला.
त्याच्या कुजक्या मेंदूतून रणवीरने उलटी केल्याचे दिसते, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला खडसावले आहे. इतकेच नव्हे तर
रणवीर अलाहाबादीयाच्या इतर युट्युब शो वर बंदी घालण्याची सूचनाही सर्वोच्च
न्यायालयाने केली आहे. youtube च्या एका कार्यक्रमात रणवीरने उधळलेली मुक्ताफळ अत्यंत हिणकस असल्याची
नोंद सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्याने निवडलेले शब्द आणि त्याची बोलण्याची
तऱ्हा पाहता जगातील प्रत्येक पालक विशेषता आई-वडील लाजून मान खाली घालावेत. रणवीर सारख्यामुळे अख्ख्या समाजाची मान खाली
गेली आहे. अलाबादिया याविरुद्ध कायदा कठोरपणे आपला हक्क बजावेल, अशी ग्वाही सुप्रीम कोर्टाने दिली आहे. भाऊ बहीण आई-वडील यांच्या
नात्यातील पावित्र्य जपायला हवे. हे सांगण्यास न्यायालय विसरले नाही. तुम्ही केवळ
लोकप्रिय असल्याने काहीही बरगळू शकत नाही. अशा विखारी वक्तव्य करणाऱ्यांचे सुप्रीम
कोर्ट संरक्षण करू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने
मंगळवारी सकाळी झालेल्या सुनावणीत म्हटले आहे. दुसरीकडे वारंवार पाठपुरावा करूनही
रणवीर अलाबादीया हाती लागत नसल्याचे मुंबई आणि गुवाहाटी पोलिसांनी न्यायालयासमोर
भूमिका मांडली आहे. रणवीर संपर्क कक्षेच्या बाहेर असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
काय आहे नेमकं प्रकरण?
स्टॅंडअप कॉमेडियन समय रैना चा शो 'इंडियाज गॉट लेटेंट'काही महिन्यांपासून चर्चेत आहे.
या शोमध्ये यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली आहेत. पण आता या शोमध्ये
अश्लीलतेच्या सगळ्या सीमा ओलांडण्यात आल्या. शोच्या एका एपिसोडमध्ये आशीष चंचलानी,
अपूर्व मुखीजा, रणवीर अल्लाहबादिया आले होते.
या शोमध्ये रणवीर अलाहबादिया एका स्पर्धकाला आई-वडिलांविषयी अतिशय अश्लील असा
प्रश्न विचारला. यामुळं नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. हा प्रश्न विचारणाऱ्या
रणवीर अल्लाहबादियावर प्रचंड टीका होताना दिसतेय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या
सगळ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
कोण आहे रणवीर अल्लाहबादिया?
रणवीर अलाहबादिया हा एक युट्यूबर आहे. इतकंच नाही तर
त्याला भारत सरकारकडून सर्वोत्कृष्ट युट्यूब कंटेट आणि मोस्ट स्टाइलिश
इन्फ्लुएन्सर असे पुरस्कारही मिळालेत.पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचा गौरव
करण्यात आला होता. अनेक क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती त्यानं त्याच्या
पॉडकास्टमध्ये घेतल्या आहेत. 'बियर बाइसेप्स' असं
त्याच्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे. तो युट्यूबच्या माध्यमातून महिन्याला ३५
लाखांची कमाई करत असल्याचं म्हटलं जातं. अनेक विषयांवर तो बोलताना दिसतो. पण या 'इंडियाज गॉट लेटेंट' मध्ये त्यानं हद्द पार केल्याचं
दिसून आलं.
लोकप्रिय यूट्यूबर रणवीर अलाहबादिया आणि सोशल मीडिया
इन्फ्लुएन्सर अपूर्व मखीजा, समय रैना आणि 'इंडिया
गॉट लेटेंट' च्या आयोजकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला
आहे. शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्या प्रकरणी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कारवाई
करण्याची मागणी तर एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार यूट्यूबर रणवीर अलाहबादिया,
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्व मखीजा, कॉमेडियन
समय रैना आणि शो 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या
आयोजकांविकोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'इंडियाज गॉट
लेटेंट' या शोमध्ये अतिशय अश्लील वक्तव्य करण्यात आलं असून
मुंबईचे पोलिस आयुक्त तसंच महाराष्ट्र महिला आयोगाकडंही यासंदर्भात तक्रार दाखल
करण्यात आली आहे. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर रणवीर अलाहबादिया, समय रैना यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी
मागणी केली जात आहे.