आसाराम बापूला सर्वोच्‍च न्‍यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन


नवी दिल्ली  अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला सर्वोच्‍च न्‍यायालयाने आज (दि.७) अंतरिम जामीन मंजूर केला. १५ मार्चपर्यंतच्‍या अंतरिम जामीन काळात पुराव्यांशी छेडछाड करु नये, अनुयायांना भेटू नये, असे निर्देशही न्‍यायालयाने दिले आहेत. बलात्‍कार प्रकरणी आसाराम बापू हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्‍मठेपेची शिक्षा भोगत आहे. सर्वोच्च न्यायालयाने 85 वर्षीय आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर कराताना त्‍याने आपल्या अनुयायांना भेटू नये असे निर्देश दिले आहेत. आसाराम बापूवर सध्या जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्‍याला यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्या जामिनाच्या कालावधीत देखरेखीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. स्वयंघोषित संत आसारामबापू याला बलात्कारप्रकरणी मागील वर्षी जन्‍मपेठेची शिक्षा सुनावण्‍यात आली. या प्रकरणी गांधीनगर अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाने दोषी ठरवले होते. आसारामची ही दुसरी शिक्षा ठरली होती. 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी त्‍याला जोधपूर न्यायालयाने २०१८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सध्या ८५ वर्षीय आसामरामबापू जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.