ग्रामपंचायत मतदारसंघातून सुभाष देशमुख गटाने बाजी मारली; कल्याणशेट्टी गटाला एक जागा

मंद्रूप: सोलापूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूक साठी रविवारी शांततेत मतदान झाले होते. सोमवारी कर्मवीर आप्पासाहेब गाडगे मंगल कार्यालय मध्ये मतमोजणी सुरुवात झाली. यावेळी ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून अपेक्षेप्रमाणे आमदार सुभाष देशमुख यांची सुपुत्र मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी आणि अतुल गायकवाड विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक सुनील कळके विजयी झाले आहेत. सुरुवातीला ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघाचे मतमोजणी सुरुवात झाली. यावेळी सुरुवातीपासूनच मनीष देशमुख व रामप्पा चिवडशेट्टी आघाडीवर होते.  देशमुख यांना ६३५ तर चिवडशेट्टी यांना ६१४ तर संगमेश बगले ३७१ गणेश वानकर यांना ४७९ मते मिळाली आहेत. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून गायकवाड यांना ५८९ तर रविंद्र रोकडे ५१८ मते मिळाली आहेत. यावेळी गायकवाड यांनी ७१ मतांनी विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या समर्थक सुनील कळके यांना ५७० तर यतीन शहा  ५३६ मते मिळाली आहेत.  कळके हे ३४ मतांनी विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात सुभाष देशमुख यांनी तीन जागा मिळवल्या तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाने एक जागा मिळवली आहे.