बेलाटी येथे शाळेच्या व्हॅनमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; देगाव परिसरात शोककळा

सोलापूर, ८ एप्रिल :– उत्तर सोलापूर
तालुक्यातील बेलाटी गावात मंगळवारी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात १३
वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अनुराग तीप्पन्ना राठोड असे मृत मुलाचे नाव
असून तो डेगाव तांडा – बसवेश्वर नगर येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार,
शाळेची व्हॅन सुरू असताना चालत्या वाहनातून तो अचानक खाली पडला,
आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात इतका गंभीर होता की,
अनुरागला वाचवण्याची संधीही मिळाली नाही. घटनेनंतर
शाळा व्यवस्थापन, पालक आणि स्थानिक नागरिकांत भयंकर हळहळ
व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे डेगाव परिसरात शोककळा पसरली असून, वाहन सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाकडून
या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे समजते.