जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी प्रकरणी माेठी कारवाई

नवीदिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जम्मू आणि काश्मीरमध्ये
पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. काश्मीरमध्ये १२ ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे.
सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात राष्ट्रीय
तपास संस्था छापे टाकत आहे. केंद्रीय गृह
मंत्रालयाच्या आदेशानुसार, २४ ऑक्टोबर रोजी, एनआयएने
आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरून लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी
संबंधित सक्रिय दहशतवाद्यांच्या भारतीय हद्दीत घुसखोरीबाबतच्या माहितीच्या आधारे
गुन्हा दाखल केला होता. एनआयएने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्रकरणासंदर्भात
असाच शोध घेतला होता. या काळात 'एनआयए'ने
संशयितांच्या परिसरातून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली होती.