पंजाबमध्ये विचित्र अपघात! ९ जण जागीच ठार

चंदिगढ: पंजाबमधील फिरोजपूर भागात आज एक भीषण अपघात झाला. फिरोजपूर फाजिल्का महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तुटलेल्या कॅन्टरला एका अनियंत्रित हायस्पीड पिकअप वाहनाने मागून धडक दिली. या भीषण अपघातात सुमारे ९ जण जागीच ठार झाले. तर ११ जण गंभीर जखमी झाले. महिंद्रा पिकअप आणि बिघाड झालेल्या कॅन्टरमध्ये मोठी टक्कर झाल्याच्या वृत्तामुळे पसरली भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय, मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत आणि त्यांची ओळख पटवण्याचे आणि त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना जवळच्या ३ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज शुक्रवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास हा अपघात झाला. पिकअप गाडीत सुमारे २० लोक होते. हे सर्व लोक वेटर असल्याचे सांगितले जात आहे जे लग्न समारंभासाठी जलालाबादकडे जात होते. या अपघातानंतर अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.