भारत-पाक शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 2,200 अंकांनी वधारला
.jpeg)
मुंबई : भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर सीमेवरील तणाव काही प्रमाणात
कमी झाल्याने भारतीय शेअर बाजारात सोमवारी (१२ मे) मोठी तेजी पाहायला मिळाली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्सने तब्बल २,२०० अंकांची उसळी घेत ८१,७०० चा टप्पा पार केला. तर निफ्टी ६५० अंकांनी वाढून २४,७०० च्या वर पोहोचला. विशेषतः मिडकॅप शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. शस्त्रसंधीमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारातील व्यवहार अधिक मजबूत
होताना दिसले. फार्मा वगळता सर्व सेक्टर ग्रीन
झोनमध्ये आजच्या व्यवहारात निफ्टी फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हात होते. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल अवघ्या काही तासांत १०.५ लाख कोटींनी वाढले.
टॉप गेनर्स कोण?
- अदानी
पोर्ट्स, ॲक्सिस बँक: प्रत्येकी ४% वाढ
- टाटा
स्टील, बजाज फायनान्स, एनटीपीसी, एलटी, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, कोटक बँक: २-४% वाढ
- दुसरीकडे, सन फार्मा ४.७% घसरला
एफआयआय व डीआयआयची भूमिका:
- परदेशी
गुंतवणूकदारांनी (FIIs) ९ मे रोजी ३,७९९ कोटींची विक्री केली
- देशांतर्गत
संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) ७,२७८कोटींच्या शेअर्सची
विक्री केली
सीमेवरील स्थिती सामान्य
शनिवारी शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर काही तासांत
पाकिस्तानकडून गोळीबाराचे प्रकार झाले, मात्र भारतीय सैन्याने वेळेवर उत्तर दिले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून बाजारावर त्याचा सकारात्मक
परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.