बऱ्याच दिवसानंतर शेअर बाजारात तेजी; बीएसईला मोठा धक्का

मुंबई : शेअर बाजारात बऱ्याच दिवसांनंतर तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात दिसले, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. मात्र, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या एका निर्णयामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला मोठा धक्का बसला. एनएसईने एप्रिल 2025 पासून फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) कॉन्ट्रॅक्ट्सचा एक्सपायरी डे बदलण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम गुंतवणूकदारांवर तर होणारच आहे, पण त्याहीपेक्षा देशातील सर्वात जुने एक्सचेंज बीएसई ९ टक्क्यांनी कोसळले. बीएसईला मोठा फटका का बसलागुंतवणूकदार आणि ट्रेंड अॅनालिस्ट्सच्या मते, एफ अँड ओ एक्सपायरी बदलल्याने ट्रेडिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात एनएसईकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीएसईवरील ट्रेडिंग व्हॉल्यूम कमी होऊ शकतो, ज्याचा परिणाम शेअर्सच्या किमतींवर झाला. गुंतवणूकदारांसाठी पुढील दिशा कायविश्लेषकांच्या मते, मार्केटमध्ये अस्थिरता कायम राहू शकते. गुंतवणूकदारांनी लाँग-टर्म गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.