महावीर जयंतीमुळे आज शेअर बाजारात सुट्टी; BSE आणि NSE बंद

मुंबई: देशातील प्रमुख शेअर बाजार बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) गुरुवार, 10 एप्रिल 2025 रोजी महावीर जयंतीच्या निमित्ताने बंद राहणार आहेत. त्यामुळे आज कोणतेही शेअर व्यवहार होणार नाहीत. एनएसईच्या हॉलिडे लिस्टनुसार, गुरुवारी इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग (SLB) आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGR) यासह सर्व विभाग बंद राहतील. शुक्रवार, 11 एप्रिलपासून नियमित व्यवहार पुन्हा सुरू होतील, अशी माहिती अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एप्रिलमध्ये आणखी सुट्ट्या:
एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांना आणखी दोन सुट्ट्यांचा सामना करावा लागणार आहे.

  • 14 एप्रिल (सोमवार) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
  • 18 एप्रिल (शुक्रवार) – गुड फ्रायडे

2025 मधील काही प्रमुख सुट्ट्या:

  • 15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
  • 2 ऑक्टोबर – गांधी जयंती / दसरा
  • 21 22 ऑक्टोबर – दिवाळी लक्ष्मीपूजन व बलिप्रतिपदा
  • 25 डिसेंबर – नाताळ

गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील या सुट्ट्यांचा विचार करून आपले खरेदी-विक्रीचे निर्णय घ्यावेत, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञांनी दिला आहे.