शेअर बाजारात घसरण ट्रम्प यांच्या दुसऱ्या इंनिंगचे असेही स्वागत

मुंबई:  डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या व्यापार धोरणाबाबत अनिश्चितता आहे. ट्रम्प यांनी अनेक देशांवर उच्च टॅरिफ आकारला जाणार असल्याची आधीच घोषणा केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री सुरूच आहे. तसेच, 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. या सर्व गोष्टींचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम दिसून येत आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या इंनिंगचे असे स्वागत झाल्याने गुंतवणूकदारांना डाक्का बसला आहे. भारतीय शेअर बाजारात आज मोठे चढउतार पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर मंगळवारी आज सकाळ शेअर बाजार वाढीसह उघडला. सेन्सेक्स सकाळी जवळपास 100 अकांच्या वाढीसह 77,100 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी50 इंडेक्स 23,400 अंकांवर व्यवहार करत होता. मात्र, नंतर दोन्ही इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. बेंचमार्क इंडिसेस असलेल्या बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये सकाळी 11वाजता जवळपास 1 टक्के घसरण पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स 848 अंकांनी घसरून 76,224 वर, तर NSE निफ्टी 217 अंकांनी घसरून 23,127.70 अंकांवर आला. अवघ्या काही मिनिटात बाजारातील तीव्र विक्रीमुळे गुंतवणूकदारांना जवळपास 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही जवळपास 2 टक्क्यांची घसरून दिसून आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर बाजारात मोठी घसरून दिसून आली आहे. त्याआधी सोमवारी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण शेअर बाजारातील घसरणीचा सर्वाधिक फटका फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोला बसला आहे. झोमॅटोच्या शेअरमध्ये आज सकाळी 11 वाजेपर्यंत जवळपास 10.53 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणीसह शेअरची किंमत 214.35 रुपयांवर आली आहे. तसेच, डिक्सॉन, ऑबेरॉय रिएल्टी, पेटीएम आणि कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्सच्या किंमतीतही घसरण दिसून आली आहे.