नेहरू नगरमध्ये स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुतळ्याचे अनावरण १२ एप्रिल रोजी

सोलापूर दि. १० - नेहरूनगर येथील  मागास समाजसेवा मंडळ येथे  समाजसेवक, दलितमित्र आणि शिक्षणमहर्षी स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १२ एप्रिल सायं. ५.३० वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते, राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली, आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. नेहरूनगर सारख्या ओसाड माळरानावर ज्यांनी बंजारा समाजासाठी शिक्षणाद्वारे खुली केली, हुंडाबंदी, आंतरजातीय, धार्मिक व सामुदायिक विवाहाला उत्तेजन दिले. असे स्व. चंद्राम रामचंद्र चव्हाण गुरुजी यांनी लमाण समाजसेवा संस्था या नावाने संस्था स्थापन करुन या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कार्य राबवून बहुजन वर्गातील अनेक गुरुजींनी केले आहे. याच कार्यक्रमात जय नायडू लिखीत E=mc² या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार असून गरिब होतकरु आणि हुशार वि‌द्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस राजकुमार कस्तुरे, रवींद्र चव्हाण, जयवंत हाके, मच्छिंद्रनाथ राठोड, संजीव ढोपरे, सूर्यकांत रजपूत, सुरज जाधव आधी उपस्थित होते.