सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने पोलिस आयुक्तालय येथे आस्थापना वेळे बाबतीत निवेदन...

सोलापूर- शहर हद्दीतील लहान मोठ्या उद्योग व्यवसायासाठी रात्री अकरा
वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा अध्यादेश होता परंतु आता गेले चार-पाच दिवस ही वेळ
रात्री १० वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे रात्री दहा वाजता बंद करायचे असेल तर नऊ
वाजल्यापासून बंद करायची तयारी करावी लागते सध्या गणपती उत्सव आहे त्यानंतर दसरा
आहे सोलापुरात मोठ्या प्रमाणात देवीचा उत्सव साजरा केला जातो त्यानंतर लगेच दिवाळी
आहे अशी एका मागोमाग एक सण आहेत सुट्टीच्या निमित्ताने बाहेरील लोकं सोलापूरमध्ये
येतात त्यामुळे उद्योग व्यवसायाला वाढीसाठी फायदेशीर आहे, त्यानंतर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आचारसंहितेत परत तेच नियम आयुक्तालय
करणे लावण्यात येतात महाराष्ट्रातील इतर सिटींमध्ये असे नियम नसताना सोलापूर
मध्येच असे नियम लागू करून लहान मोठ्या उद्योजकांना आणि सामान्य नागरिकांना याचा
त्रास सहन करावा लागत आहे सोलापुरात मोठे उद्योग व्यवसाय येत नाही बेरोजगारी
मोठ्या प्रमाणात वाढत असताना आपण जर चालू उद्योग व्यवसाय त्यांना जर पाठिंबा देऊन
वाढीसाठी सहकार्य केले पाहिजे. नाही तर लहान उद्योग व्यावसायिक अडचणीत येईल. त्या उलट सोलापूर मध्ये डान्सबार, मटका, वेश्या व्यवसाय, मसाज
पार्लर, क्रिकेट सट्टा, जुगार अड्डा
असे अवैध धंदे रात्रंदिवस चालू आहेत त्यामुळे सोलापूर मध्ये गुन्हेगारी वाढत असून
हे बंद करून गुन्हेगारी, बेरोजगारी थांबवण्यासाठी सोलापूर
शहरात जे लहान मोठे उद्योग व्यवसाय आहेत त्याला प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी
सोलापूर शहरात उद्योग व्यवसायासाठी रात्री ११ वाजेपर्यंतचा वेळ पूर्ववत करण्यात
यावे अन्यथा यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आज सोलापूर शहर राष्ट्रवादी
शरदचंद्र पवार उद्योग व व्यापार सेलच्या वतीने निवेदन पोलीस आयुक्तालयात देण्यात
आले. यावेळी सेल शहर अध्यक्ष श्री.संपन्न दिवाकर यांच्या सह युवक प्रदेश उपाध्यक्ष
प्रशांत बाबर, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे,
मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद शिकलगार, शिक्षक
सेल शहर अध्यक्ष अश्विनकुमार नागणे, दक्षिण विधानसभा
कार्याध्यक्ष मुसा अत्तार, अमित मोतेवार, झहीर गोलंदाज, हे उपस्थित होते.