राज्य सरकार हिंदू विरोधी, यत्नाळ यांचा आरोप

विजयपुर :- सीईटी परीक्षेदरम्यान शिमोगा आणि बिदरसह राज्यातील विविध भागात विद्यार्थ्यांचे जानवे कापून , काढून टाकण्यात आल्याची घटना म्हणजे कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदूविरोधी धोरणाचे पालन करत असल्याचे स्पष्ट होते, असे विधान शहराचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले आहे. मुस्लिमांना खुश करण्यासाठी एका धर्माचे तुष्टीकरण करणारे काँग्रेस सरकार हिंदू प्रथा आणि धार्मिक श्रद्धा नष्ट करण्याचे काम करत आहे. हिंदू समुदायाचे विभाजन करण्याच्या उद्देशाने जातीय जनगणना करणाऱ्या या काँग्रेस सरकारने आता विद्यार्थ्यांचे जानवे काढून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जानवे घालणाऱ्यां ब्राह्मण, क्षत्रिय, राजपूत, कलाल, मराठा, विश्वकर्मा आणि इतर समुदायांवर केलेल्या अपमानाचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे. ब्राह्मण विद्यार्थ्यांचे जानवे काढून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्यांवर सरकारने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना सेवेतून बडतर्फ करावे.  परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली पाहिजे.या घटनेमुळे  सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. सरकारने ताबडतो संबंधित दोषींवर कारवाई करावी अन्यथा, राज्यभरातील लोकांना हिंदूविरोधी सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

दीपक शिंत्रे