Starlink ला भारतात परवानगी! एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सेवा लवकरच सुरू

नवी दिल्ली / मुंबई : एलन मस्क यांच्या SpaceX कंपनीची Starlink
सॅटेलाईट इंटरनेट सेवा भारतात सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे.
भारत सरकारने स्टारलिंकला SatComm सेवा सुरू करण्याची मंजुरी
दिल्याची माहिती समोर आली असून लवकरच ही सेवा देशात कार्यरत होणार आहे. ही माहिती
अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नसली, तरी PTIच्या सरकारी सूत्रांकडून ती मिळालेली आहे. ग्रामीण भारतात इंटरनेटची
क्रांती Starlink ही सॅटेलाईट इंटरनेट सेवा लो अर्थ ऑर्बिट (LEO)
मधून कार्य करते, जिथे उपग्रह पृथ्वीपासून 550
किमी अंतरावर असतात. यामुळे ही सेवा हाय-स्पीड, कमी विलंबाची आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचणारी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देऊ
शकते. देशातील जिथे अजूनही इंटरनेट पोहोचलेलं नाही, अशा
भागांमध्ये Starlink डिजिटल क्रांती घडवण्याची क्षमता ठेवते.
Starlink सेवा किती
दरात मिळणार?
प्राप्त माहितीनुसार, Starlink चे सुरुवातीचे इंटरनेट प्लान ₹850
पेक्षा कमी दराने सुरू होणार आहेत. यामध्ये अनलिमिटेड डेटा उपलब्ध
असेल. हे प्लान ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीत असतील, त्यामुळे हे जगातील सर्वात स्वस्त सॅटेलाईट इंटरनेट प्लान्सपैकी एक मानले
जात आहे.
सेवा कधीपासून सुरू होणार?
Starlink कंपनीने
अद्याप सेवा सुरू होण्याची अचूक तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, 15 दिवसांचे ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर ही सेवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू
होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या सेवेकरिता Jio
आणि Airtel या कंपन्यांशी भागीदारी करण्यात
आली आहे. त्यामुळे Starlink चे अँटेना आणि सेटअप डिव्हाइसेस
या कंपन्यांच्या स्टोअरमध्ये उपलब्ध असतील.
Starlink चे उद्दिष्ट
काय आहे?
भारतामध्ये Starlink चे उद्दिष्ट १ कोटीहून अधिक
वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे आहे. कमी दरात इंटरनेट सेवा पुरवून कंपनी भारतातील
स्पेक्ट्रम खर्चाची भरपाई करण्याचा प्रयत्न करणार आहे.
Starlink म्हणजे काय?
Starlink ही SpaceX
कंपनीची सॅटेलाईट इंटरनेट सेवा आहे. जगातील सर्वात मोठ्या LEO
सॅटेलाईट नेटवर्कद्वारे ही सेवा दिली जाते. यामागील प्रमुख उद्दिष्ट
म्हणजे जगभरातील कोणत्याही भागात – अगदी मोबाईल टॉवर नसलेल्या ठिकाणीही – जलद आणि
विश्वसनीय इंटरनेट पोहोचवणे.