उत्तर प्रदेशात निर्वाण महोत्सवादरम्यान स्टेज कोसळला ; ५ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक

लखनौ : उत्तरप्रदेशातील बागपतच्या बरौत याठिकाणी आयोजित जैन निर्वाण महोत्सवात कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला स्टेज अचानक कोसळल्याने ५ भाविकांचा मृत्यू झाला. तर २५ हून अधिक पुरुष, महिला आणि मुले जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. एसपी आणि अतिरिक्त एसपी मोठ्या पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी उपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मानस्तंभावर भाविक लाडू देत असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचले. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, एसपी अर्पित विजयवर्गीय आणि अतिरिक्त एसपी देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. याठिकाणी भगवान आदिनाथांच्या निर्वाणासाठी लाडू अर्पण करण्याचा कार्यक्रम चालू होता. त्या काळात स्टेजवर भाविकांची संख्या वाढली. तेव्हाच हा अपघात झाला आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा कार्यक्रम बरौत येथील दिगंबर जैन महाविद्यालयाच्या मैदानात सुरू होता.