SSC निकाल उद्या जाहीर: निकालासाठी अधिकृत वेबसाईट्स जाहीर, येथे पाहा तुमचा SSC निकाल
.jpeg)
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळामार्फत इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल
मंगळवारी, १३ मे २०२५ रोजी जाहीर होणार आहे. निकालासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांची
प्रतिक्षा अखेर संपली आहे.
दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर
मंगळवारी सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार असून,
त्यानंतर दुपारी १ वाजता दहावीचा निकाल बोर्डाच्या अधिकृत
संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे:
- 🔗 https://results.digilocker.gov.in
- 🔗 https://sscresult.mahahsscboard.in
- 🔗 http://sscresult.mkcl.org
बोर्डाच्या पत्रकार परिषदेत राज्याचा
एकूण निकाल, मुलींचे व मुलांचे
उत्तीर्ण टक्केवारी, तसेच जिल्हानिहाय
यशाची आकडेवारी सादर केली जाईल.
अकरावीची प्रवेशप्रक्रिया सर्वत्र
ऑनलाइन पद्धतीने
या वर्षापासून राज्यभर अकरावीचे
प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवले जाणार आहेत. याअंतर्गत नोंदणी
शुल्कात कपात करण्यात आली असून केवळ ₹१०० शुल्क आकारले
जाणार आहे.
यापूर्वी केवळ मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाइन होती. आता ती संपूर्ण राज्यभर लागू
होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अधिक सुलभ होणार आहे.