सोलापूर मधील MAAC ॲनिमेशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे जागतिक पातळीवर यश

सोलापूरमधील MAAC ॲनिमेशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवत 24 FPS VFX चॅलेंज स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बॉलीवूड आणि हॉलीवुड सिनेमा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध VFX शो लाईन प्रोड्यूसर अमरीश पटेल, MAAC मुंबईचे झोनल सेल्स मॅनेजर साम्या शर्मा, तसेच HDFC बँकेचे टेरिटोरी मॅनेजर श्रीधर निकते उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे, 24 FPS VFX चॅलेंज स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

 प्रमुख पाहुण्यांचे विचार

अमरीश पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
"
मी 18 वर्षांपूर्वी ज्युनियर मॉड्युलर म्हणून सुरुवात केली होती. कठोर मेहनत आणि सातत्याने कौशल्य विकसित करत गेल्यामुळे आज मी शो लाईन प्रोड्यूसर म्हणून काम करत आहे. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील संधी ओळखून मेहनत घेतल्यास त्यांचे भविष्यात उज्ज्वल करिअर होऊ शकते." तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, "पुढील वर्षी या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवा," अशा शुभेच्छा दिल्या.

VFX क्षेत्रातील संधी आणि अनुभव

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याचे स्वतः विद्यार्थ्यांनी आपले अनुभव प्रेक्षकांसमोर शेअर केले. याशिवाय, बॉलीवूड आणि हॉलीवुडमधील ॲनिमेशन, गेमिंग आणि VFX मध्ये करिअरच्या संधी कशा आहेत, याबाबत मार्गदर्शन MAAC इन्स्टिट्यूटचे संचालक प्रवीण लांडे यांनी केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले, तर प्रतीक रोडगी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात अमृता मोरे आणि प्रतीक रोडगी यांचे विशेष सहकार्य लाभले.