सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत 'भाजपा' ठरला किंग; कुणाला किती जागा मिळाल्या?

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा आणि निर्णायक विजय मिळवला आहे. १०२ जागांच्या सोलापूर महापालिकेत बहुमतासाठी ५२ जागांची आवश्यकता असताना भाजपाने तब्बल ६५ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे आणि माकप यांनी एकत्रित लढत दिली होती. मात्र मतदारांनी स्पष्ट कौल भाजपाच्या बाजूने दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

पक्षनिहाय जागावाटप

1.       भाजप – 65

2.      एमआयएम – 8

3.      शिवसेना (शिंदे गट) – 1

4.      काँग्रेस – 1

5.      राष्ट्रवादी (अजित पवार) – 0

6.     राष्ट्रवादी (शरद पवार) – 0

7.      शिवसेना (उद्धव ठाकरे) – 0

प्रभागनिहाय निकाल (महत्त्वाचे प्रभाग)

  • प्रभाग क्र. 1 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 2 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 3 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 4 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 5 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 6 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 8 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 10 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 11 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 12 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 13 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 14 – एमआयएम (4)
  • प्रभाग क्र. 16 – भाजप (2), शिवसेना (शिंदे) (1), काँग्रेस (1)
  • प्रभाग क्र. 19 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 20 – एमआयएम (4)
  • प्रभाग क्र. 22 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 23 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 24 – भाजप (4)
  • प्रभाग क्र. 26 – भाजप (3)

या निकालानंतर सोलापूरच्या राजकारणात भाजपाचे वर्चस्व स्पष्ट झाले असून आगामी महापौर आणि स्थायी समितीवरही भाजपाचा प्रभाव राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विरोधकांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात असून पुढील काळात आत्मपरीक्षणाची गरज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.