चोरीच्या पावणेआठ लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त

शहर गुन्हे शाखेने दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या पावणे आठ लाखांच्या 15 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे (वय 25, रा. मंगरूळ, ता. तुळजापूर) व शुभम भागवत सावंत (वय 28, रा. चिंचोली, ता. तुळजापूर सध्या रा. मंगरूळ, ता. तुळजापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी सोलापूर शहर, लातूर, पुणे, इंदापूर, भिगवण, रत्नागिरी, बिदर येथून 15 मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले आहे. त्यांच्याकडून 15 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, नूतन पोलीस उप आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजीत धायगुडे, काशिनाथ वाघे, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली.