सोलापूर बी.सी. गर्ल्स हॉस्टेलचे नामकरण मातोश्री रमाई आंबेडकर वसतिगृह करण्याची मागणी

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ती स्वाभिमानी पत्नी होती त्या जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई म्हणून सोलापूर शहरातील बी सी गल्स हॉस्टेलला ला मातोश्री रमाई आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह असे नामकरण करून गौरव करण्यात यावा.अशी मागणी प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी माननीय आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना निवेदन सादर करण्यात आले.परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहचू दिली नाही. रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. 14 जानेवारी 1946 साली सोलापूरला डॉ. बाबासाहेब आंबेड़कराची अखेरची भेट ठरली या भेटी दरम्यान विविध ठिकाणी कार्यक्रम आखण्यात आला होते बॅकवर्ड क्लास विदयाथी वसतिगृहाच्या मोकळ्या मैदानात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आयोजित केले होते ही बाब समस्त सोलापूरकर व भीम सैनिकांच्या सन्मानार्थ राहील ही एक ऐतिहासिक घटना आहे तरी आपण बी सी गर्ल्स हॉस्टेलला ला मातोश्री रमाई आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह असे नामकरण करण्याबाबत संबंधित विभाग आदेश द्यावे असे निवेदन सादर केले.