चिमुकल्यांनी केले निराधारांसाठी धान्य संकलन ;जैन गुरुकुलात 'एक मूठ धान्य' उपक्रम

सोलापूर, दि. १३
ऐ.प.दि.जैन पाठशाळा संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत स्काऊट-गाईड
विभागाच्या वतीने 'एक मूठ धान्य' उपक्रम
राबविण्यात आले. यामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी समाजातील निराधार वृद्धांना
अन्नदानासाठी ६७५ किलो धान्य संकलन केले. संकलित
केलेले धान्य मुख्याध्यापक राजकुमार काळे व विद्यार्थ्यांच्या हस्ते लोकमंगल
फाउंडेशनकडे अन्नपूर्णा योजनेसाठी सुपूर्द करण्यात आले. यावेळी लोकमंगल फाउंडेशनचे
संचालक मारुती तोडकर, दिपाली कोठारी, प्रशालेचे
पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, गाईड कॅप्टन तृप्ती माणिकशेटे, स्काऊट
मास्टर प्रसन्न काटकर, जितेंद्रकुमार डहाळे, रोहिता शहा
आदी उपस्थित होते. सदर उपक्रमाचे पालक, माजी
विद्यार्थी व शिक्षकांकडून कौतुक केले जात आहे.