गायक सोनू निगम रुग्णायालात कार्यक्रम सुरु असताना आली चक्कर

पुणे : सुप्रसिद्ध गायक सोनू निगमची प्रकृती भर कॉन्सर्टमध्येच बिघडल्याचे सांगण्यात आले. सोनू सध्या पाठदुखीने त्रस्त आहे. यावर तो उपचार घेत असून काल पुण्यात भर कॉन्सर्टदरम्यान त्याला पुन्हा पाठदुखीचा त्रास सुरू झाला. मात्र तरीही त्याने प्रेक्षकांना निराश न करता गाणी सुरूच ठेवली. ज्यानंतर आता चाहत्यांनी त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कॉन्सर्ट झाल्यानंतर सोनू निगमने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर प्रकृतीबद्दल माहिती दिली. व्हिडीओमध्ये सोनू निगम हा कॉन्सर्टमध्ये बॅक स्टेजवर पाठीच्या त्रासाने ओरडताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये त्यानं लिहिले की, “सरस्वतीजींनी काल रात्री माझा हात धरला होता. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता, पण समाधानकारकही राहिला. गाणे गाताना माझ्या मणक्यात क्रॅम्प आला. कोणीतरी माझ्या पाठीवर सुई टोचत असल्यासारखे वाटत होतं. पण मी कसं तरी सावरलं. कॉन्सर्ट चांगला झाला, याचा मला आनंद आहे. लोकांना निराश करायला आवडत नाही, मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला.” त्याच्या या  व्हिडिओनंतर चाहत्यांनीही त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, सोनू निगम हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांपैकी एक आहे आणि त्याच्या नावावर पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार आहेत. जगभरात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र आता त्याच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी  चिंता व्यक्त केली आहे.