शुभांशु शुक्ला यांचा ऐतिहासिक उड्डाणाचा मुहूर्त ठरला; 'Ax-4' अंतराळ मोहीम बुधवार २५ जूनला

नवी दिल्ली भारतीय वंशाचे इस्रोचे (ISRO) माजी वैमानिक आणि सध्या अंतराळवीर म्हणून कार्यरत असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा सहभाग असलेली ऐतिहासिक ‘Ax-4’ ही खासगी अंतराळ मोहीम २५ जून रोजी दुपारी १२:०१ वाजता (IST) प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. ही माहिती नासाने अधिकृतरित्या जाहीर केली आहे. या मोहिमेचे प्रक्षेपण सुरुवातीला २९ मे रोजी नियोजित होते, परंतु तांत्रिक अडचणी, खराब हवामान आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (ISS) गळतीमुळे सात वेळा पुढे ढकलण्यात आले. आता मोहिमेसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि हवामान अनुकूल राहिल्यास हे ऐतिहासिक प्रक्षेपण होणार आहे.

कुठून होणार प्रक्षेपण?

‘Ax-4’ मोहिमेचे प्रक्षेपण स्पेसएक्स (SpaceX) कंपनीच्या फाल्कन-९ (Falcon-9) रॉकेटद्वारे केनेडी स्पेस सेंटर (Kennedy Space Center) मधील लाँच कॉम्प्लेक्स ३९-A वरून होणार आहे. या मोहिमेत एक नवीन ‘ड्रॅगन’ यान अंतराळात सोडण्यात येईल, जे २६ जून रोजी सायंकाळी ४:३० वाजता (IST) ISS शी जोडले जाईल.

मोहिमेतील सदस्य कोण?

या मोहिमेचे नेतृत्व पेगी व्हिटसन (अ‍ॅक्सिऑम स्पेसमधील संचालिका आणि प्रसिद्ध अंतराळवीर) करत आहेत.

  • शुभांशु शुक्लापायलट (भारत वंश)
  • सावोश उझनास्की विनिएवस्कीESA प्रतिनिधी (पोलंड)
  • तिबोर कपूमिशन स्पेशालिस्ट (हंगेरी)

सात वेळा पुढे ढकलले गेले प्रक्षेपण

1.       8 जूनक्रू ड्रॅगन यानातील इलेक्ट्रिकल हार्नेसमधील बिघाड

2.      ९ जूनफाल्कन-९ च्या तांत्रिक चाचणीत उशीर

3.      १० जूनखराब हवामान

4.      ११-१२ जूनप्री-लाँच चाचणीत ऑक्सिजन गळती

5.      २२ जून – ISS मध्ये गळतीमुळे उड्डाण रद्द

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण शुभांशु शुक्ला हे खासगी मिशनमध्ये सहभागी होणारे मोजके भारतीयांपैकी एक आहेत. भारताच्या अंतराळ विज्ञानातील जागतिक सहभागाला यामुळे अधिक बळ मिळणार आहे. त्यांच्या सहभागामुळे भारतीय तरुणांसाठी अंतराळ संशोधनाचा नवद्वार खुले होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.