शुभांशू शुक्ला - अॅक्सिओम-4 मोहिमेवर अंतराळात!

मुंबई :- भारतीय वायूदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे अमेरिका, पोलंड आणि हंगेरीच्या अंतराळवीरांसह Axiom-4 मोहिमेवरून गुरुवारी सकाळी अवकाशात पोहोचले. ते सायंकाळी ४.३० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचणार आहेत. “लहान पाऊल, पण भारतासाठी मोठी झेप” – शुभांशू शुक्ला अंतराळात पोहोचल्यावर शुभांशू शुक्ला यांनी स्पेसएक्सच्या लाईव्ह स्ट्रीमदरम्यान संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “माझ्या झोपेचा दर्जा चांगला आहे, दृश्यांचा आणि अनुभवांचा मी मनमुराद आनंद घेत आहे. मी लहान मुलासारखा शिकत आहे – अंतराळात कसे चालायचे, खायचे हे शिकतो आहे. चुका करणे ठीक आहे, पण दुसऱ्यांना पाहून शिकणे अधिक चांगले आहे.” शुक्ला यांनी या मोहिमेला भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी "एक लहान पण स्थिर पाऊल" असे संबोधले. क्रू टीममध्ये तीन देशांचे प्रतिनिधित्व शुभांशू शुक्ला यांच्यासोबत या मोहिमेत सहभागी असलेले अन्य अंतराळवीर:
- पेगी
व्हिटसन (अमेरिका)
– मोहिमेचे कमांडर
- टिबोर
कापू (हंगेरी)
– मिशन स्पेशालिस्ट
- स्लावोज
उजनांस्की-विस्निव्स्की (पोलंड)
– मिशन स्पेशालिस्ट
भारतीयांना दिले भावनिक आवाहन शुक्ला
म्हणाले, “हे केवळ आमच्या तांत्रिक यशाचे प्रतीक
नाही, तर भारताच्या महत्त्वाकांक्षा, आकांक्षा
आणि भविष्याचेही दर्शन घडवणारे एक पाऊल आहे. प्रत्येक भारतीयाने या प्रवासाचा भाग
व्हावे, हा माझा आग्रह आहे.” ते ISS
वर १४ दिवस राहून वैज्ञानिक प्रयोग, निरीक्षण
आणि सांस्कृतिक संवाद साधणार आहेत. यासोबतच ते त्यांच्या अनुभवांचे व्हिडिओ आणि
छायाचित्रे तयार करून ती देशवासीयांपर्यंत पोहोचवणार आहेत. 1984 नंतर प्रथमच भारतीय अवकाशात 1984 मध्ये राकेश शर्मा
यांनी भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून इतिहास घडवला होता. ४१ वर्षांनंतर आता
शुभांशू शुक्ला हे अंतराळात पोहोचणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. त्यामुळे भारताच्या मानव अंतराळ मोहिमेतील हा क्षण ऐतिहासिक ठरतो आहे.