श्री सिद्धेश्वर प्रशाला सा.का. कुमठे चा दहावीचा निकाल 96.20 टक्के

कुमठे : श्री सिद्धेश्वर प्रशाला, साखर कारखाना कुमठे येथील दहावीचा निकाल यंदा ९६.२०% इतका लागला असून, एकूण ४० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत यशस्वी झाले आहेत. यंदा विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण, २१ विद्यार्थ्यांनी ८० ते ९०% गुण, आणि ११ विद्यार्थ्यांनी ७५ ते ०% गुण मिळवले.

शाळेतील प्रथम तीन यशस्वी विद्यार्थी:

1.       🥇 आजादी दाऊदमलिक मुल्ला – ९२.००%

2.      🥈 संध्याराणी सुनील सुतार – ९१.६०%

3.      🥉 श्रेया केशव थोरात – ९१.२०%

या विद्यार्थ्यांचा गौरव श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. समीर सलगर साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना समीर सलगर साहेब म्हणाले, "पालकांनी विद्यार्थ्यांची आवड व कुवत ओळखून पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी, जेणेकरून विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचतील." अध्यक्ष धर्मराज काडादी साहेब, समन्वयक संतोष पाटील सर, मुख्याध्यापक मेसे सर (प्राथमिक विभाग), मुख्याध्यापक गुरव सर (प्रशाला विभाग) तसेच प्राथमिक व प्रशाला विभागातील सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.