सिद्धेश्वर मंदिरात श्रावण मासाची जय्यत तयारी
.jpeg)
स्वच्छता, बँरिकेट व विद्युत रोषणाईची कामे अंतिम टप्प्यात
सोलापूर दि.१९-पवित्र श्रावण महिना सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्यावतीने जयत तयारी करण्यात येत आहे. श्रावण महिन्यात महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातून लाखो भाविकांची दर्शनासाठी सिद्धेश्वर मंदिरात मांदियाळी असते.